देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

नवनाथ भक्तीसार पारायणं कस करावे:

 !!नमो आदेश!!

 नवनाथ भक्तीसार पोथीबाबत काही नियम:


 आता 'श्रीनवनाथ भक्तिसार' ह्या पोथीचे पारायण करू इच्छिणार्‍या पाठकांना या पोथीच्या संदर्भात काही सूचना अवश्य या द्याव्याशा वाटतात. त्या अशा-

१) ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडात बांधून पवित्र जागी ठेवावी.

२) पोथीचे पारायण करताना पाने उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावून पाने कधीही उलटू नयेत. (हा नियम अन्य ग्रंथांची पाने उलटतानाही खरे तर अवश्य पाळावा.)

३) रोजचे पारायण संपल्यावर पोथीवर फूल वाहण्यास विसरू नये. व म्हणतत "नाथ महाराज मजबरोबर चला व कार्य सिद्ध करा"
तत्पूर्वी पोथी कपाळी लावून तिला नम्र भवाने वंदन करावे.

४) आरती झाल्यावर पोथी वरूनही नीरांजन ओवाळावे व उदबत्ती दाखवावी.

५) पोथीच्या रूपात नाथांचेच वास्तव्य घरात आहे असे समजून तिची काळजीपूर्वक जपणूक करावी.

6)  'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही.

संकल्प कसा करावा:

आपली मनोकामना सांगून हातात पाणीअक्षता घेऊन ७ दिवसाच ९ दिवसांचा संकल्प करावा हातातील पाणी ताटात सोडावे.
  श्रावण महिन्यात हे पारायणं रोज 1 ते 2 अध्याय वाचून करण्यात येत.

 
पूजेची मांडणी:

     एक पाटावर किंवा चौरंगावर एक नवीन कोरा कापड टाकून त्यावर ग्रंथ ठेवावा, बाजूला गणपतीची म्हणून विडा चे पान ठेवावे, नारळ ठेवावा, दक्षिणा ठेवावी..
 व पाटाच्या भोवती रांगोळी टाकावी, व वाचन होईपर्यंत समई तेवत ठेवावी..

पारायणं सांगता कशी करावी:

परायणच्या सांगतेच्या दिवशी ९  लहान मुले  भोजनास बोलवावे.  सर्वांचे पाद्य पुजन करावे भस्म गंध फुले हार घालावे नमस्कार करावा . जेवणास वाढुन दक्षिणा ठेवावी.

  पारायणं संगतेच्या वेळी नैवेद्य :

भोजनास नैवद्य:- मुगाची खिचड़ी, घेवड्याची भाजी, उडदाचे वडे, कढी, पाट वड्या, अळूपान वडी, जोधल्याची खिर, पुरी, मेथी भाजी, डांगर, चटनी, गवार, भेडी, वाल, कारले, काकडी, बटाटे, ई. यांची मिक्स भाजी करणे सार  भजी पापड ताक इत्यादीचा नैवद्य असावा.

नवनाथ पारायण करण्याचे महत्व


अध्याय १ : समंधबाधा नाहीशी होऊ शकते.

अध्याय २ : धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते.

अध्याय ३ : शत्रूचा नाश , मुष्टियुद्ध , विद्येची प्राप्ती , घरात मारुतीचे वास्तव्य.

अध्याय ४ : कपटाची बंधने सुटतील , शत्रूचा पराभव, राजदरबारी मान .

अध्याय ५ : घरात भूतबाधा असेल, तर थांबेल व पुनः होणार नाही.

अध्याय ६ : शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल.

अध्याय ७ : ८४ लाख योनीत जन्म येणार नाही. व्यथा, चिंता संपेल.

अध्याय ८ : दूरदेशी गेलेला मित्र परत येईल. काळजी संपेल.

अध्याय ९ : चौदा विदया व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील.

अध्याय १० : स्त्री - दोष नाहीसे होतील. मन सात्वीक होईल. मुले जगतील .

अध्याय ११ : अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल.

अध्याय १२ : देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील.

अध्याय १३ : स्त्री - हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल.

अध्याय १४ : कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकांत राहता येईल.

अध्याय १५ : घरातील भांडणे थांबून सुख - शांती लाभेल.

अध्याय १६ : वाईट स्वप्नांचा नाश होईल.

अध्याय १७ : योगसिध्दि लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल.

अध्याय १८ : ब्रम्हहत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल.

अध्याय १९ : परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल.

अध्याय २० : मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल.

अध्याय २१ : गो - हत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल.

अध्याय २२ : ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल.

अध्याय २३ : घरातील सुवर्ण टिकून राहील.

अध्याय २४ : बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील.

अध्याय २५ : शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल.

अध्याय २६ : गो - हत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत.

अध्याय २७ : हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल.

अध्याय २८ : गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल.

अध्याय २९ : क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल.

अध्याय ३० : चोरांची दृष्टी नाहीशी होईल.

अध्याय ३१ : शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत.

अध्याय ३२ : गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल.

अध्याय ३३ : धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल.

अध्याय ३४ : सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल.

अध्याय ३५ : महासिध्दी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उध्दार होईल.

अध्याय ३६ : साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल.

अध्याय ३७ : दु:शीलपणा संपून विदया प्राप्त होईल.

अध्याय ३८ : हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील.

अध्याय ३९ : युध्दात विजय प्राप्त होऊ शकेल.

अध्याय ४० : कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल.
    

   ग्रंथ बद्दल थोडी माहिती:


  •   नवनाथ भक्तीसार हा फक्त ग्रंथ नसून तर तो एक किमयागार ग्रंथ आहे, नवनाथ महाराज आपले काम अंग ओडवून करतील असे स्वतः गोरक्षनाथ आपल्या ह्या ग्रंथ सांगतात।।।।
  •       हा ग्रंथ एकदा वाचून प्रचिती घेऊन बघा, नाथ महाराज म्हणजे नवनारायण आहेत ते ।।।।
  •         भूत प्रेतं पिशाच बाहेरील बाधा दूर होतात हे अनुभव आहेत, नवनाथ म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होतात।ते देवांची मिलिटरी फोर्स आहे असे म्हणण्यात वावग ठरणार नाही।

   महिलानी पारायणं करायची नियम:

  • पारायण वाचण्यापूर्वी अंगोळ करावी . केस मोकळे सोडावे व पेटीकोट ची गाठ बांधू नये.
  
         
         !!श्री स्वामी समर्थ! 

टीप::

 अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंट करून कळवावे, 

शत्रू पासून मुक्तीसाठी करायची सेवा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा।।



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?