देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?

 !!श्री स्वामी समर्थ!!


स्वामींची मूर्ती स्थापना 


     आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे. जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्या शिवाय घर अपूर्ण असते. त्याच प्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्वाचे व आपल्या भाग्याचे.

      ज्या स्वामी सेवेकर्याने कडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या त्या स्वामी सेवेकर्यांनी पुढील प्रमाणे स्थापने तथा गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्टित करणे.

 स्वामींना साधी भोळी सेवा आवडते त्यामुळे पुढील सेवा हि साधी सरळ सर्व स्वामी सेवेकर्यांनी करता येईल अशी आहे.

पुढील प्रमाणे सेवा करावी

१) हातात पळीभर पाणी घेणे त्यात दोन दाणे अक्षता टाकणे व स्वामींना विनंती करणे पुढील प्रमाणे -
    आज गुरुवार रोजी मी ( आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करावा ) आपल्या या घरात स्वामी आपली प्रतिष्ठापना करीत आहे. या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आज पासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा  पितरांची देखिली सेवा स्वामी तुम्ही आमच्या कडून करवून घ्या. तसेच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक, कौटुंबिक, आर्थिक, पारमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा. तुमची कृपा दृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या. आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्ती वर अभिषेक करत आहे. ती सेवा आपण स्वीकारा."
       एवढे बोलून हातातील पाणी ताम्हणात सोडावे व नमस्कार करावा.

२) एका ताम्हण मध्ये स्वामींची मूर्ती ठेवणे, अष्टगंध लावणे अक्षता टाकणे धूप दीप ओवाळणे. पळीने किंवा गळकीने गायीच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याच्या अभिषेक करावा.  अभिषेक करतांना पुढील मंत्र स्तोत्रांचे पठण  करावे. व पाण्याची अथवा दुधाची संततधार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी.
     जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना अत्तर, फुल, तुळशीपत्र टाकून अभिषेक करावा.
     १) श्री स्वामी समर्थ मंत्र - १ माळ
     २) गणपती अथर्वशीर्ष  - १ वेळा
     ३) पुरुष सूक्त - ११ वेळा
     ४) पवमान सूक्त - १ वेळा
     ५) श्री सूक्त - १६ वेळा
    
     पठन झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जल ने स्वच्छ करणे, स्वच्छ कापडाला पुसून घेणे.

३) स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरी वर ठेवणे कारण स्वामी अ  वर्गातील देवत्व आहे.

 ४) स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी २ दाणे अक्षता घेऊन - श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि - असे बोलून अक्षता त्या जागे वर ठेवणे.

५) स्वामींच्या मूर्तीला वस्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवणे व स्वामींच्या मूर्ती ला हिना अत्तर लावणे ( स्वामींच्या हाताला व चरणांना )
     मूर्ती वर उजव्या हाताची मधील ३ बोटे ठेऊन - सुप्रतिष्टिमस्तु - असे म्हणने

६) श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः  अष्टगंधकं विलेपनार्थे समर्पयामि
    असे बोलून स्वामींना अष्टगंध लावणे

७) श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः  पुष्पम समर्पयामि
     असे बोलून स्वामींना पुष्प,तुलसी,️बिल्व पत्र अर्पण करणे .

८)  श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः धूपम आघ्रपयामि
     असे बोलून स्वामींना धूप दाखवणे

९)  श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपम दर्षयामी
     असे बोलून स्वामींना दीप ओवाळणे

१०)  श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः  नैवद्य समर्पयामि
       असे बोलून स्वामींना नैवद्य दाखवणे - दूध भात  बुंदीचे, रव्याचे, बेसनाचे लाडू, पंचामृत, गूळ शेंगदाणे, खीर, फळ ई  पैकी काहीही .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा