देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

नागपंचमी ला पूजा कशी करावी व नवनाग स्तोत्र

 नागपंचमी चे महत्त्व,कथा, पूजाविधी व उपाय

       नाग पंचमीला श्रावणात खूप महत्त्वाचे मानले जाते. नाग पंचमी दरवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमी तिथीला साजरी केली जाते. 
       या दिवशी सापांची पूजा केली जाते, नाग पंचमीचा दिवस दोष दूर करण्यासाठी आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. ज्योतिषांच्या मते, नागपंचमीच्या दिवशी व्यक्ती काल सर्प दोष निवारणाची विधीवत पूजा करून सर्प दोष, पितृ दोष आणि काल सर्प दोष यांच्यापासून मुक्ती मिळवू शकते.
         कालसर्प योग असल्यामुळे व्यक्तीला मानसिक त्रास, पैसे मिळण्यात अडथळा, लग्नात विलंब, संतानप्राप्ती  मध्ये अडथळा आणि घरातील कलह यांचा सामना करावा लागतो.     
         व्यक्ती ला त्याच्या क्षमतेचे, कामाच्या कार्यक्षमतेचे पूर्ण परिणाम मिळत नाहीत. म्हणूनच अशा लोकांनी काल सर्प दोष निवारण केले पाहिजे. म्हणून नाग पंचमीच्या शुभ दिवशी कालसर्प दोष निवारण करा, जेणेकरून व्यक्तीचे सर्व अडथळे दूर होतील.

1.नागपंचमी ची पूजा कशी करावी::


स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. नवनाग स्तोत्र वाचावे

2.नवनाग स्तोत्र:


अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्.

शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥

एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्.

सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः.

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥

मंत्राचा अर्थ - अनंत, वासुकी, शेषा, पद्मनाभ, कांबळ, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया हे नऊ सर्प देवांची नावे आहेत. दररोज सकाळी नियमितपणे जर या मंत्राचा जप केला तर सर्प देवता तुम्हाला सर्व पापांपासून सुरक्षित ठेवेल आणि तुम्हाला जीवनात विजयी बनवेल, त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.


3.नागपंचमी ची कथा:

1.सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
      प्रत्येक स्त्री हे पूजन  करून भाऊला दीर्घआयुश्याची कामना करते.
2.
🌹 *कहाणी नागपंचमीची* 🌹
एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लाडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

4.नागपंचमीच्या दिवशी  हे  उपाय करा


 नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीसोबत तुरटी चा तुकडा ठेवा.
नागपंचमीच्या दिवशी सापाच्या बांब्याला दूध अर्पण करा. ही युक्ती केल्याने तुमचे सर्व त्रास संपतील.
 नागपंचमीच्या दिवशी सुगंधी फुले आणि चंदन लावून सापाची प्रतिमेचे पूजा करा.
नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला जलाभिषेक करताना शिवलिंगाला चांदीची नाग आणि नागांची जोडी अर्पण करा असे केल्याने तुम्हाला साप दोषापासून सुटका मिळेल

5.नागपंचमीला काय  नियम पाळावे:


नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?