मंगळागौर चे महत्त्व व कथा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
!!श्री स्वामी समर्थ!!
!!! ओम नमः शिवाय!!
मंगळागौर कशी साजरी करतात?
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीता मंगळागौर पूजतात. लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करायचे असते.शिवपार्वती यांची मंगळागौरी निमित्त पूजा केली जाते. त्यांच्याप्रमाणे प्रेम नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे.
लग्नानंतर आईने मुलीला दिलेले 'सौभाग्य व्रत' म्हणून मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे.
किती वर्ष साजरी करावी?
लग्नानंतर पाच वर्ष मंगळागौरी साजरी केली जाते. त्यानंतर पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन करतात.मंगळागौर पूजा विधी:
चौरंगावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करतात. शेजारी महादेवाची पिंड ठेवतात. कलश आणि दीप पूजनानंतर अन्नपूर्ण आणि पिंडीची पूजा करावी. विविध पत्री, फुले वाहावीत.नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इ. धान्ये मूठीने अर्पण करावीत. धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर अखंड सौभाग्यप्राप्ती आणि समृद्धीसाठी देवीची प्रार्थना करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. रात्री जागरण करून महिला नवविवाहित स्त्रियां विविध खेळ खेळून मंगळागौर साजरी करता.
पत्रीपूजा:
वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात .अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पाने पत्रीपूजेला वापरतात.
पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते .मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मौन धारण करुण जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात.
उद्यापान कसे करावे:
उद्यापनासाठी गुरुजी प्रथम पती- पत्नीला एकत्र बसवून संकल्प करतात.सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे शिव-मंगळागौरी पूजन, १०८ बिल्वअर्चन, सौभाग्यवर्धक १०८ कुंकुमार्चन ,रुद्राभिषेक,अर्चन व हवन असा विधी असतो . ज्या ठिकाणी होमहवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई-वडिलांना द्यायचे असते. आई-वडील जर नसतील तर भाऊ-भावजय यांना हे वाण देऊन उद्यापन करतात.मुलीच्या आईला द्यायचे सौभाग्यवाण :
तांब्याच्या तपेल्यांत सोन्याचा लहानसा नाग घालून त्याला दादरा बांधून व लाडू असे वाण देण्याची प्रथा आहे. व वडिलांना शर्टपीस रुमाल टोपी देऊन सन्मान करावा..
किंवा अगदी साधे पणाने देवाजवळ अक्षता वाहून नमस्कार करावा व चुकभुल माफ करावी असे म्हणून सुखी वैवाहिक आयुष्याची प्रार्थना करावी.
मंगळागौर ची कथा:
श्री मंगळागौर ची आरती:
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या